Tuesday, June 3, 2008

निरागसते मागचे तूफान
मुंबईतील शारदाश्रम विद्यामंदीरात प्रशिक्षक रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची सुरूवात केली. त्याने विनोद कांबळीच्या साथीने १९८८-८९ मध्ये एका सामन्यात ६६४ धावांची भागीदारीचा विक्रम केला होता
मैं खेलेगा! सचिनने १९८९ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरूवात केली. १६ वर्षीय सचिनच्या समोर इम्रान खान, वसीम अक्रम आणि अब्दुल कादीर सारखे खतरनाक गोलंदाज होते. याच दौ-यात सचिनला एका सामन्यात बॉल लागल्यानंतर रक्त वाहू लागलं. तर दुस-या बाजूला उभ्या असलेल्या नवज्योतसिंग सिध्दूने विचारलं पॅवेलियन जाणार का तर त्यावेळेस सचिन म्हणाला ‘ मैं खेलेगा ’

आशीर्वाद बाबांचे... सचिनला १९९९च्या वर्ल्ड कप सुरू असताना फार मोठी वैयक्तीक हानी झाली. या दरम्यान त्याचे वडील रमेश तेंडुलकर यांचं निधन झालं. या सा-या दुःखातून तो सावरून परतला तर त्याने केनियाच्या विरुद्ध शतक झळकावले.
शतकी खेळी केल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करताना 'बालसचिन'.. इथून सुरू झालेली ही परंपरा आज १९ वर्षांनंतरही सुरूच आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधली शतकं, द्विशतकं मोजली तरी सचिननं आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा असं अभिवादन केलंय.

सचिनला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण आपल्या महाराष्ट्रानं दिलेला शिवछत्रपती पुरस्कार त्याला आजही मोलाचा वाटतो. त्याच्यातली प्रतिभा हेरून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा विश्वास सचिननं सार्थ ठरवला आहे.

बहारदार खेळी करणारा सचिन सगळ्याच थोरा-मोठ्यांचा छोटा मित्र होता. रिचर्ड हॅडलींसारख्या गोलंदाजानंही सचिनचं भरभरून कौतुक केलंय. आज सचिन सगळ्या तरुण खेळाडूंचा मोठा मित्र आहे. गॉड, गाइड, फिलॉसॉफर असंच त्याचं वर्णन प्रत्येक संघसहकारी करतो.

परदेश दौ-यावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सचिनला शॅम्पेनची बाटली पुरस्कार म्हणून देण्यात आली. आपल्या बॅगतली ती बाटली सचिनन प्रामाणिकपणे विमानतळावरच्या अधिका-यांना दाखवली आणि त्यांच्या परवानगीनंतरच तो ती घेऊन गेला.
बाळाचे पाय पाळण्यातचं दिसतात हा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. आश्चर्य वाटलं असेल ना ? २४ एप्रिल १९७३ मध्ये जन्माला आलेल्या या चिंटुकल्याकडे पाहून कोणाला अंदाज तरी आला असेल का की हा मोठा होऊन क्रिकेटच्या दुनियेतील बेताज बादशहा बनणार.

क्रिकेट हे सचिनचं सर्वस्व आहे... त्यामुळे बॅट घेऊन मैदानात उतरला की त्याचा चेहरा खुलतो. आजही इतकंच निखळ हास्य त्याच्या चेह-यावर पाहायला मिळतं.

आत्ताच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौ-यात ब्रेट ली च्या झंझावाती बॉलवर सचिनने खेचलेला स्ट्रेट ड्राइव आठवतोय? सचिनचा तो अविस्मरणीय शॉट आहे. त्याच्यासाठी तो एकच स्ट्रेट ड्राइव अविस्मरणीय असला तरी त्याचा प्रत्येक स्ट्रेट ड्राइव त्याच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहे. ही त्याचीच तर प्रॅक्टीस नाही ना?
शिवाजी पार्कवर रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीत सचिन तयार झाला. खरं तर सचिनची बॅट पकडण्याची पद्धत शास्त्रशुद्ध नव्हती, पण सरांनी त्याला त्याच्या स्टाइलमध्ये खेळू दिलं. आज तीच स्टाइल आदर्श मानली जाते. आचरेकर सरांना सचिनचा किती अभिमान वाटत असेल, ते शब्दांत सांगणं कठीणच!

शाळेत असताना कुठल्यातरी मॅचमध्ये बहुतेक सचिनला कुणीतरी आउट केलं असावं... त्याच्याकडेच तो निरखून पाहत असणार.. पण सचिनची ही नजर म्हणजे प्रतिस्पर्ध्यांसाठी धोक्याची घंटाच असते. एखाद्या नव्या बॉलरने सचिनला लवकर आउट केलं, तर पुढच्या मॅचमध्ये त्याच्या बॉलिंगची कशी पिसं निघतात, हे वेगळं सांगायची गरज नाही.

शाळेत असताना सचिन-विनोद जोडीनं रचलेली २०० धावांची भागीदारी चांगलीच प्रसिद्ध आहे. त्याची पुनरावृत्ती अनेकदा झाली.

Thursday, May 22, 2008

सचिनला एकमेव ठरवणारे ते पहिले विक्रम

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश करण्याआधी सचिन तेंडुलकरने आपली विशेष कामगिरी केली ती घरच्या मैदानावर. चार विशेष कामगिरीचा तपशील असा...

हॅरीस ढाल स्पर्धा
शाळेतील स्पर्धेत विनोद कांबळीच्या मदतीने शारदाश्रमसाठी , तिस-या विकेटसाठी ६६४ धावांची विश्वविक्रमी भागीदारी सचिनच्या नावावर आहे. हा सामना आझाद मैदानावर , स्ट्रेट झेवियर्स शाळेविरुद्ध , फेब्रुवारी १९८८ साली झाला होता. सचिनने ३२६ धावा तर कांबळीने ३४९ धावा केल्या. स्ट्रेट झेवियर्स शाळेतील संघात मुंबईचा सध्याचा कर्णधार साईराज बहुतुले होता व त्याच्या गोलंदाजीची पृथक्करण होतं : २७-०-१८२-०.

एकमेव फलंदाज
सचिन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटमधील असा एकमेव फलंदाज आहे ज्याने रणजी चषक , दिलीप चषक व इराणी चषक या तिन्ही स्पर्धेत आपल्या पदार्पणातील सामन्यात शतक नोंदवलं आहे. त्याचा संपूर्ण तपशील असा आहे. रणजी चषक स्पर्धेत , मुंबईसाठी गुजरातविरुद्ध , वानखेडे इथं खेळताना त्याने १०० नाबाद धावांची खेळी केली. विशेष म्हणजे सचिनचे त्या सामन्यातील दहाही साथीदार आता निवृत्त झाले आहे. यानंतर पश्चिम विभागासाठी पूर्व विभागाविरुद्ध गुवाहाटी इथे खेळताना , त्याने अंतिम सामन्यात १५९ व ८ धावा केल्या. पश्चिम विभागात , रवी शास्त्री , संजय मांजरेकर , दिलीप वेंगसरकर , विनोद कांबळी या नामी फलंदाजाच्या समावेश होता. शेवटी इराणी स्पर्धेत शेष भारत संघासाठी खेळताना त्याने दुस-या डावात नाबाद १०३ धावा केल्या होत्या त्या दिल्लीसमोर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर. विशेष म्हणजे या तिन्ही सामन्यात सचिनच्या शतकाने त्या त्या संघाला विजय मिळवता आला नाही. १९८८-८९ च्या मोसमात गुजरातविरुद्ध व १९९०-९१ मोसमात पूर्व विभागाविरुद्ध सामने अनिर्णित राहिले तर १९८९-९० सालातील दिल्लीविरुद्ध सामन्यात दिल्लीचा ३०९ धावांनी विजय झाला होता.

-अनंत गवंडळकर

एका शिखराची जडणघडण...

उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही देऊन जात असतो , पण त्या संध्याकाळी मला खूप काही मिळाल्यासारखे वाटले. त्यावेळी मी रेल्वेसाठी खेळत होतो. शिवाजी पार्कच्या कामत मेमोरियल क्रिकेट क्लबवर आचरेकर सरांचा नेहमीचा सराव सुरू होता. सरांनी मला हाक मारली ; जवळ बोलावले आणि म्हणाले , नेटमध्ये सराव करतोय , तो मुलगा पाहिलास. माझ्या तोंडून चटकन उद्गार आले की , गेला काही वेळ मी केवळ त्याच्याकडेच पाहतोय. त्याच्या जोरकस फटक्यांनी माझे लक्ष वेधून घेतले होते. पण त्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन सर म्हणाले की , चिमुरड्या वयात चेंडू ' मिड्ल ' करण्याचे त्याचे कौशल्य निश्चित वाखाणण्याजोगे आहे. दररोज सराव करून खराब झालेल्या विकेटवर ज्याप्रकारे हा लहानगा खेळत होता ते बघत राहण्याजोगे होते. हा चिमुरडा म्हणजे आजच्या घडीचा झुंजार फलंदाज सचिन तेंडुलकर.

आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सचिनने आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केले. पण याची पाळंमुळं त्याच्या मेहनतीत दडली आहेत.

फलंदाजी म्हणजे सचिनचा जीव की प्राण. सराव करतेवेळी सचिन वेळ वाया घालवताना कधीही दिसला नाही , ही गोष्ट महत्त्वाची म्हणायला हवी.फलंदाजी करताना सर सचिनच्या स्टम्पवर नाणे ठेवायचे आणि ते नाणे पडले नाही तर सचिनला ते नाणे बक्षीस देण्यात येत असे. याचा अर्थ सचिनने बाद होण्याचे टाळले पाहिजे , असा होता. अशी नाणी गोळा करण्यात सचिनला हळूहळू स्वारस्य वाटू लागले आणि सचिन दमदार फलंदाजी करू लागला.

' लास्ट राऊन्ड ' ओरडल्यावर नेटमध्ये फलंदाजी करणाऱ्याने आवरते घ्यायचे असा संकेत असतो , पण सचिन फलंदाजी करत असताना विनोद नेटबाहेर ताटकळ उभा असायचा. त्यावेळी विनोद सारखा ' लास्ट राऊन्ड ' असे ओरडत असायाचा , पण त्याकडे दुर्लक्ष करून शक्य तितका वेळ फलंदाजी करायचा. फलंदाजी आटोपली की , सचिन हातात चेंडू घेत असे तो अंधार पडेपर्यंत त्याची गोलंदाजी सुरूच असे. त्यावेळी सचिन मध्यमगती गोलंदाजी करायचा. स्वस्थ बसणे त्याच्या स्वभावाला मानवणारे नव्हते हेच खरे.

सचिन आणि विनोद या दोघांमधील चर्चेचा विषयही क्रिकेट असायचा. कोणत्या गोलंदाजाचा कसा समाचार घेतला आपण कशाप्रकारे सामना जिंकला ते आंतराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या एखाद्या खेळाडूच्या फटक्याभोवती चर्चा रंगत असे.

उपजत गुणांनी समृद्ध असणारा सचिन आपल्या कामगिरीचे नेहमी सिंहावलोकन करत असे. सरांनी एखादी चुक नजरेस आणून दिल्यावर सचिनच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरायला लागत असे. चुक दुरुस्त करण्यासाठी सचिनचा झगडा सुरू व्हायचा. पण सचिनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याकडून चुकांची पुनरावृत्ती सहसा होत नसे , नाही.

सचिनची बॅट पकडण्याची शैली इतरांसारखी नाही , त्यामुळे काही जणांनी या कारणावरून नाके मुरडली. पण सरांनी त्यांच्या नैसगिर्क शैली बदलण्याचा अट्टाहास केला नाही , ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. असे मला वाटते कारण सचिनला स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी , फुलण्यासाठी सरांनी पुष्कळ वाव दिला आणि त्याच्यातील सुप्त गुणांना हेरले. प्रचंड क्षमता असलेल्या या खेळाडूची वाटचाल प्रगल्भेतच्या दिशेने असल्याचे त्याची कामगिरी स्पष्ट करत होती , त्यामुळे कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नव्हती , पण लहानगा सचिन प्रतिभावंत असल्याचे आचरेकर सरांनी कधीच हेरले होते. हा दष्टा प्रशिक्षक ही सचिनपेक्षा थोर म्हणायला हवा. प्रत्येक अनुभवातून शिकण्याकडे सचिनचा कल असे. ही वृत्ती अंगी बाणवल्यामुळे सचिनने आपले वेगळेपण सिद्ध केले. अत्युच्च शिखर गाठूनही ' ग ' ची बाधा त्याला झालेली नाही , हे त्याच्या मोठेपणाचे द्योतक ठरावे.

-नरेश चुरी

वडापाव हा सचिनचा वीकपॉइट

शारदाश्रममधील दिवस आठवले की काळ कसा झटकन निघून गेला त्याची जाणीव होते. ८६-८७ मध्ये सचिन तेंडुलकर , विनोद कांबळी यांच्या साथीने शारदाश्रमने हॅरिस , गाईल्स तसेच पाम बीच ढाल आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत जेतेपद पटकावून तिहेरी मुकुटाचा मान संपादला होता. कित्येक वर्षांपूर्वीच्या आठवणींची पाने चाळताना माझा मित्र व शालेय सहकारी सचिन तेंडुलकर वाढदिवस साजरा करतोय , अन या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देताना बालपणीचे मस्तीचे दिवस आठवतात.

शारदाश्रमचा सराव असायचा तो शिवाजी पार्कवर , मुंबई क्रिकेटचीच नव्हे तर भारतीय क्रिकेटची पंढरी हा शिवाजी पार्कचा लौकिक. आचरेकर सरांची पाच नेटस असायची अन् विशेष म्हणजे या पाचही नेटस्वर सचिन न कंटाळता सराव करायचा. सराव संपला तरी त्याचा उत्साह कमी होत नसे. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही तो रममाण व्हायचा.

वडापाव हा सचिनचा वीकपॉईंट , विनोद आणि सचिनची वडापाव खाण्यात कॉम्पिटिशन लागायची , सहा-सात वडापाव ते सहज फस्त करायचे पण यातही सचिनच बाजी मारायचा. शिवाजी पार्क जिमखान्याच्या कँटिनमध्ये तेव्हा भेळही चांगली मिळायची , नेटसमधील सराव संपल्यावर आमचा मोर्चा वळायचा तो कँटिनकडे आणि वडापाव , भेळ यावर आम्ही ताव मारायचो.

शिवाजी पार्कवर क्रिकेटच्या अवलियांची कधी कमतरता जाणवत नाही , मला आठवतंय आम्ही शाळेत असताना राजाभाऊ नावाचे एक वयस्कर गृहस्थ शारदाश्रमचे सामने आवर्जून बघत असत आणि राजाभाऊंची खासियत म्हणजे ते आम्ही किती धावा काढणार , सामना कोण जिंकणार याचा अंदाज वर्तवित असत आणि त्यांचे अंदाज बहुधा तंतोतंत खरे ठरत असल्यामुळे आम्हा मुलांमध्ये ते पॉप्युलर होते , अजूनही ते पार्कात हजेरी लावतात.

सचिनचा उत्साह वाखाणण्याजोगाच , ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर तेव्हा डेनाईट क्रिकेट सामने खेळले जायचे , अर्थात ही गोष्ट आहे सतरा , अठरा वर्षापूवीर्ची. ठाण्यातील सामन्यात राजिंदरसिंग घई खेळत होता व त्याच्या गोलंदाजीवर सचिन खूष असायचा. घई भारतासाठी काही सामने खेळला. मी ठाण्यात राहत असल्यामुळे व सामना रात्री उशिरा संपल्यामुळे सचिनने माझ्या घरीच मुक्काम केला होता.

सचिन शारदाश्रममध्ये असताना काकांकडे राहायचा , तो शिवाजी पार्कमधील इंदवदन सोसायटीत. तिथे सचिनसह विनोद , मी आणि संतोष जाधव असे चौघांचे टोळकं एकत्र जमायचं , सचिनच्या काकांच्या घरात मग आम्ही खूप धमाल करायचो. गॉल्फचा पांढरा चेंडू घेऊन आम्ही खेळत असू. हा चेंडू चांगला उसळत असे व त्यामुळे खेळताना मजा यायची.

शारदाश्रमकडून खेळताना बरीच धमाल आम्ही करायचो , खासकरून क्रॉस , आझाद मैदानात आमची मॅच लौकर संपल्यावर आम्ही मेट्रो , लिबर्टी , एम्पायर या थिएटरमध्ये इंग्लीश सिनेमे बघायला जायचो आणि एकदा तर मोठी मजा आली होती. शिवाजी पार्कवरील आमची मॅच दुसऱ्या दिवशी सकाळी लौकर आटोपल्यावर आम्ही चौपाटीवर गेलो. ओहोटी असल्यामुळे आम्ही समुदात बरेच आत शिरलो व खेकडे पकडले यातही अर्थात सचिनच आघाडीवर होता. प्रशिक्षक दास शिवलकर मात्र आम्हाला शोधून हैराण झाले होते कारण त्यांना न सांगताच आम्ही चौपाटीवर धूम ठोकली होती. अखेरीस त्यांनी आम्हाला सज्जड दम भरला पण मासेमारीची मौज मात्र अनोखीच ठरली.

संगीतातही सचिनला भलतीच रूची. सचिनदेव बर्मन या नामवंत संगीतकारावरून नाव त्याला ठेवण्यात आलं आहे. शारदाश्ाममध्ये असतानाही तो अल्बम आवडीने ऐकायचा. डायर स्ट्रेटस हा त्याचा आवडता अल्बम , संगीतातील त्याची दिलचस्पी बालपणापासूनच.

-मयूर कद्रेकर, सचिनचा शाळासोबती