
शतकी खेळी केल्यानंतर बॅट उंचावून अभिवादन करताना 'बालसचिन'.. इथून सुरू झालेली ही परंपरा आज १९ वर्षांनंतरही सुरूच आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधली शतकं, द्विशतकं मोजली तरी सचिननं आत्तापर्यंत जवळपास १०० वेळा असं अभिवादन केलंय.
सचिनला आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण आपल्या महाराष्ट्रानं दिलेला शिवछत्रपती पुरस्कार त्याला आजही मोलाचा वाटतो. त्याच्यातली प्रतिभा हेरून कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा विश्वास सचिननं सार्थ ठरवला आहे.
बहारदार खेळी करणारा सचिन सगळ्याच थोरा-मोठ्यांचा छोटा मित्र होता. रिचर्ड हॅडलींसारख्या गोलंदाजानंही सचिनचं भरभरून कौतुक केलंय. आज सचिन सगळ्या तरुण खेळाडूंचा मोठा मित्र आहे. गॉड, गाइड, फिलॉसॉफर असंच त्याचं वर्णन प्रत्येक संघसहकारी करतो.
परदेश दौ-यावर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सचिनला शॅम्पेनची बाटली पुरस्कार म्हणून देण्यात आली. आपल्या बॅगतली ती बाटली सचिनन प्रामाणिकपणे विमानतळावरच्या अधिका-यांना दाखवली आणि त्यांच्या परवानगीनंतरच तो ती घेऊन गेला.
बाळाचे पाय पाळण्यातचं दिसतात हा आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. आश्चर्य वाटलं असेल ना ? २४ एप्रिल १९७३ मध्ये जन्माला आलेल्या या चिंटुकल्याकडे पाहून कोणाला अंदाज तरी आला असेल का की हा मोठा होऊन क्रिकेटच्या दुनियेतील बेताज बादशहा बनणार.